_MPC_DIR_MPU_III

Pune : गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांची पुणेकरांना पर्वणी !

'महाराष्ट्र गांधी स्मारक निधी'च्या गांधी सप्ताहानिमित्त आयोजित प्रदर्शनाचे उदघाटन

एमपीसी न्यूज- राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहानिमित्त ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’ आयोजित गांधीजींच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उदघाटन अभय छाजेड (विश्वस्त, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी) यांच्या हस्ते झाले.

_MPC_DIR_MPU_IV

यावेळी रमा सप्तर्षी, जांबुवंत मनोहर, आशीष जेम्स्, मयुरी शिंदे उपस्थित होते. ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चा गांधी सप्ताहानिमित्त हा अभिनव उपक्रम आयोजित केला गेला.

_MPC_DIR_MPU_II

दिनांक 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान हे प्रदर्शन बालगंधर्व रंगमंदीर कलादालनात सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत तर दिनांक 4 ते 7 ऑक्टोबर दरम्यान गांधीभवन, कोथरूड येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत सर्वांसाठी खुले राहील, अशी माहिती या प्रदर्शनाचे संयोजक नितीन शास्त्री यांनी दिली.

‘गांधीजींच्या जवळपास 450 दुर्मिळ छायाचित्रातून महत्वाच्या काही छायाचित्रांची निवड नितीन शास्त्री यांनी केली. पुढे हे गांधी विचारप्रेमी संस्थांना राज्यभर उपलब्ध करुन देण्याचा ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चा मानस आहे. गांधीजींच्या बालपण, जीवनप्रवासाचे, जीवन संघर्षाचे छायाचित्र रुप दर्शन या प्रदर्शनातून पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. सर्व छायाचित्रे कृष्णधवल असून, त्यात गांधीजींच्या प्रारंभीच्या काळापासून, विविध चळवळी, दांडीयात्रा, असहकार चळवळ ते हत्येपर्यंतच्या प्रसंगांच्या छायाचित्रांचा समावेश आहे

ही छायाचित्रे मिळवण्यासाठी विविध संस्था आणि व्यक्ती यांचे सहकार्य लाभले. 20 वर्षे यावर संशोधन सुरू होते, असे शास्त्री यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1