Pune : पेट्रोलच्या दराची शंभरीकडे वाटचाल ! पेट्रोल 91.40 पैसे तर डिझेल 78.83 पैसे लिटर

एमपीसी न्यूज- सातत्याने होत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आता 91 रुपयांचा टप्पा पार केला आहे. त्यातच भर म्हणून घरगुती वापराच्या गॅसच्या किंमतीतही दरवाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पुण्यात पेट्रोलचा भाव 91.40 पैसे तर डिझेलचा भाव 78.83 पैसे झाला आहे.

यंदाची दसरा दिवाळी सर्वसामान्य नागरिकांसाठी दुहेरी संकट घेऊन येणार आहे. एकीकडे पेट्रोल डिझेलची दरवाढ तर दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्येही दरवाढ झाल्यामुळे यंदा दिवाळी साजरी कशी करायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. विनाअनुदानित घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमध्ये तब्बल ५९ रुपयांची वाढ तर, अनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमतीत 2.89 रुपयांची वाढ झाली.

सोमवारी पेट्रोलचा भाव 91.28 पैसे होता. त्यामध्ये 12 पैशांची वाढ होऊन आज पेट्रोल 91.40 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 16 पैशानी वाढ होऊन आज डिझेलचा भाव 78.83 पैसे झाला आहे. ऑगस्टच्या उत्तरार्धापासून पेट्रोलच्या किंमतीत रोज थोडी थोडी असे करत 6.59 रुपयांनी तर, डिझेलच्या किंमतीत 6.37 रुपयांनी वाढ झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.