pune : आयपीएच तर्फे तीन दिवस मनोविकार तज्ज्ञांच्या माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन

एमपीसी न्यूज- आयपीएच तर्फे 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान नामवंत मनोविकार तज्ज्ञांच्या माहितीपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयपीएचच्या वतीने देण्यात आली आहे. मनआरोग्य आणि समाज, प्रभावी पालकत्व तसेच बॉलिवूड आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या विषयावर ही कार्यशाळा होणार आहे.

शुक्रवारी 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता मयूर कॉलनी, कोथरूडमधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात मनआरोग्य आणि समाज तसेच दुरावा आणि आपुलकी या विषयावर टॉक शो होणार आहे. यामध्ये मॅगेसेसे पुरस्कार विजेते डॉ. भरत वाटवानी , मनोविकार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि मनोविकास तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी मनोविकार तज्ञ डॉ. सुखद चिमोटे संवाद साधणार आहेत.

शनिवारी 6 ऑकटोबर रोजी प्रभावी पालकत्व या विषयावरील कार्यशाळेत मनोविकार तज्ञ डॉ. सुखद चिमोटे यांचे व्याख्यान होणार आहे. हा कार्यक्रम आयपीएचच्या कर्वेनगर येथील कार्यालयात संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत होणार आहे. या कार्यक्रमासाठी 150 रुपये नोंदणी शुल्क असून सहभागी होण्यासाठी 7588098058 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रविवारी 7 ऑक्टोबर रोजी हिंदी चित्रपटामधून ताणतणावाचे नियोजन या विषयावर मनोविकार तज्ञ डॉ. सुखद चिमोटे यांची कार्यशाळा होणार आहे. चित्रपटातील दृश्ये आणि प्रसंग यामधून टेन्शन कसे दूर कराल हे शिकता येणार आहे. ही कार्यशाळा संध्याकाळी 5 वाजता आयपीएचच्या कर्वेनगर येथील कार्यालयात होणार आहे. या कार्यशाळेसाठी 300 रुपये नोंदणी शुल्क असून सहभागी होण्यासाठी 7588098058 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.