Pune : होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना केंद्रातर्फे आर्थिक मदत – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज- होर्डिंग कोसळून जुना बाजार परिसरात झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये व जखमी व्यक्तींना प्रत्येकी एक लाख रुपये मदत देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या संदर्भात खासदार अनिल शिरोळे यांच्याशी नवी दिल्ली येथे बोलणे झाले असून अशी मदत केंद्रातर्फे देण्यात येईल असे आश्वासन शिरोळे यांनी दिले आहे.

दरम्यान पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच नजीकच्या पोलीस चौकीत जाऊन अपघातासंबंधी तपशीलवार माहिती घेतली. त्यानंतर ससून रुग्णालयात जाऊन जखमींची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनाशी चर्चा करून रुग्णांवर सुरु असलेल्या उपचारा संबंधी माहिती घेतली. रेल्वेच्या विभागीय कार्यालयात जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ही घटना दुर्देवी असून त्याची संपूर्ण चौकशी करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले असल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.