Nigdi: कस्टमच्या अधिका-यांशी हुज्जत घालणारा अटकेत

एमपीसी न्यूज – खरेदी केलेल्या साहित्याची वस्तू व सेवा कराच्या पावतीची तपासणी करणा-या कस्टमच्या अधिका-यांशी हुज्जत घालणा-या एकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी सायंकाळी पावणेसात वाजता स्पाईन रस्त्यावर त्रिवेणीनगर चौकाजवळ घडला.

लखन काचंनसिंग जुन्नी (वय 32, रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कौशल्य नवाब सिंग (वय 28, रा. उदय हिल स्टॉप, रावेत) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सिंग हे वस्तू व सेवा कर या विभागात इन्स्पेक्टर आहेत. ते व त्यांचे सहकारी मनीष कुमार, एस. एस. मोरे, निलेश बुधगांवकर त्रिवेणीनगर चौकात वाहन चालकांकडील इलेक्ट्रॉनिक बिलची तपासणी करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी लखन याने फिर्यादी यांना ‘तुम्ही कोणाच्या परवानगीने वाहनांची तपासणी करत आहेत, तुम्ही वाहने तपासू शकत नाहीत’ असे म्हणत अधिका-यांशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आरदवाड तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.