Pimpri : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार, महिला पोलीस हवालदार, पोलीस नाईक, महिला पोलीस नाईक, पोलीस शिपाई, महिला पोलीस शिपाई संवर्गातील 181 कर्मचा-यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी काढले.

अंतर्गत बदल्या करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नियंत्रण कक्षातील 143, चाकणमधील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील 12, देहूरोड पोलीस ठाण्यातील सहा, चिंचवड पोलीस ठाण्यातील चार आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील 13 कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या देहूरोड, एमआयडीसी भोसरी, भोसरी, चाकण, चाकण वाहतूक, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, हिंजवडी वाहतूक, आळंदी, दिघी, चिंचवड, वाकड, विशेष शाखा आणि पडताळणी (विशेष शाखा) यामध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यापासून मागणीच्या प्रमाणात मनुष्यबळ पुरविण्यात आले नाही. त्यामुळे आयुक्तालयाच्या विविध शाखा सुरू करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. उपलब्ध मनुष्यबळाच्या जोरावर संपूर्ण कारभार हाकायचा असल्याने पोलीस आयुक्त आर के पद्मनाभम यांनी स्मार्ट उपक्रम सुरू करत पोलीस समाजात असल्याचे चित्र निर्माण केले आहे. अनेक पोलीस ठाण्यात वाहनांपासून मनुष्यबळापर्यंत अनेक गोष्टींची कमतरता आहे. वाहने आणि अन्य सुविधा तात्काळ उपलब्ध करणे सध्या सोयीचे नाही, परंतु आहे त्या मनुष्यबळाच्या जोरावर आणखी चांगले काम करत येऊ शकेल, असा विश्वास पोलीस आयुक्तांना असल्याने त्याच पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.