Nigdi : आयआयसीएमआर आणि फ्रेशर्स जॉब फेअर यांच्या सहकार्याने निगडीत जॉब फेअर मेळावा

एमपीसी न्यूज- आयआयसीएमआर आणि फ्रेशर्स जॉब फेअर यांच्या सहकार्याने पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी उद्या गुरुवारी (दि. 11) जॉब मेळावा आयोजित केला आहे.

निगडी येथील सेक्टर 27मध्ये आयआयसीएमआर कॉलेजमध्ये हा जॉब मेळावा सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत भरविला जाणार आहे. यामध्ये 28 कंपन्यांनी आपला सहभाग निश्चित केला आहे. नोकरीचा अनुभव असलेल्या तसेच फ्रेश विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या विविध क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार आहेत. तरी या संधीचा फायदा घ्यावा.

येताना आपली सर्व प्रमाणपत्रे व बायोडाटा (फोटोसह) आणावा असे आवाहन आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी यांनी केले आहे. ज़ॉब मेळाव्यासंदर्भातील माहिती घेण्यासाठी पुढील नंबरवर संपर्क कऱण्याचे आवाहन केले. अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर – 7038031144.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.