BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बायसिकल लघुपटाची चौथ्यांदा ‘ सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल ‘ मध्ये निवड

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- ‘अविष्कार सायन्स क्लब’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सायन्स पार्क’ ने निर्माण केलेल्या ‘बायसिकल’ या विज्ञानपटाची भारत सरकारच्या चौथ्या आंतरराष्ट्रीय ‘सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल’ साठी निवड झाली आहे.

हा लघुपट रामचंद्र राठी विद्यालयात नववीत शिकणाऱ्या सिद्धार्थ बाळकृष्ण दामले या विद्यार्थ्याने दिग्दर्शित केला आहे. अहिल्यादेवी प्रशालेत दहावीत शिकणाऱ्या सुखदा दामले या विद्यार्थिनीने चित्रीकरण केले आहे. तर स.प. महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या यश भालेराव या विद्यार्थ्याने संकलन केले आहे. लेखन डॉ. हर्षदा बार्बेकर यांचे आहे. डॉ. बाळकृष्ण दामले (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘एज्युकेशन मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’चे प्राध्यापक) यांनी मार्गदर्शन केले.

या आंतरराष्ट्रीय महोत्सवात विज्ञानातील विविध गमती- जमती उलगडून दाखविल्या जाणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या लघुपटाद्वारे गुरुत्वाकर्षण, हवेचा दबाव अशा विविध भौतिकशास्त्रीय नियमांना अतिशय सोप्या पद्धतीने सादर केले आहे, अशी माहिती डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिली.
सायकलमधील भौतिक शास्त्र संकल्पनांची अत्यंत सोप्या पद्धतीने माहिती या लघुपटातून मिळते. ‘इंटरनॅशनल सायन्स लिटरेचर अँड फिल्म फेस्टिव्हल’ लखनऊ येथे 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान झाला.

.

HB_POST_END_FTR-A1
.