Lonavala : परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांची माफी मागावी

एसटी कामगार संघटनेची मागणी

एमपीसी न्यूज- एसटी कामगारांच्या विषयी बेजबाबदार वक्तव्य करणारे राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कामगारांची व त्यांच्या कुटुंबियांची जाहीर माफी मागावी अशी मागणी मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली. मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी (दि. 11) लोणावळात पार पडली. या बैठकीची सुरुवात रावते यांच्या वक्तव्याचा निषेध करून करण्यात आली.

मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी राज्याचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांच्यासह 33 जिल्ह्यांचे विभागीय सचिव व केंद्रीय उपाध्यक्ष उपस्थित होते.

एसटी कामगारांच्या पगारवाढीबाबत औरंगाबाद येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले होते की मी कामगारांना एवढा पगार दिला आहे की ते आता वेडे झाले आहेत. रावते यांच्या या बेजबाबदार वक्तव्यांचा या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला. ताटे म्हणाले, “एसटी कामगारांना पस्तीस ते चाळीस टक्के पगारवाढ केला असल्याचा ढिंढोरा पिटला जात आहे मात्र प्रत्यक्षात केवळ सतरा ते बावीस टक्के पगारवाढ देण्यात आली आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.