Lonavala : योद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी चंद्रकांत गाडे यांची निवड

एमपीसी न्यूज- योध्दा प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी कुसगाव येथील चंद्रकांत गाडे यांची एकमताने निवड करण्यात आली. योद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश पाळेकर व संस्थापक अध्यक्ष रुपेश नांदवटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत ही निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

योद्धा प्रतिष्ठान नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे

चंद्रकांत गाडे (अध्यक्ष), उल्हास भांगरे (उपाध्यक्ष), रवी ओझरकर (कार्यवाहक), रुतिक पोटफोडे (सचिव), सुमित उके (खजिनदार), संतोषी तोंडे (प्रसिद्धीप्रमुख)

योद्धा प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून दिवाळी सणानिमित्त भव्य स्वरूपात किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले जाते. आजच्या युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले व इतिहास यांची माहिती व्हावी तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये मुलांना काही तरी नवीन शिकता यावे या करिता मागील आठ वर्षांपासून योध्दा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन लोणावळा शहरात करण्यात येते.

किल्ले बनवा स्पर्धेत सोबतच इतिहास अभ्यासक यांची गडकिल्ले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची माहिती या ठिकाणी मुलांना व्याख्यान स्वरूपात देण्यात येते. लोणावळा व ग्रामीण भागातील अनेक लहान मुलांचे ग्रुप या स्पर्धेत सहभागी होत असल्याने या किल्ले बनवा स्पर्धेला दिवसागणिक व्यापक स्वरूप प्राप्त होऊ लागले असल्याची माहिती नूतन अध्यक्ष चंद्रकांत गाडे यांनी दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.