Nigdi : विविध सामाजिक संस्थेच्या वतीने जी. डी. अग्रवाल यांना कॅंडल मार्चद्वारे आदरांजली

एमपीसी न्यूज- गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ कानपूर आयआयटीचे माजी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल 111 दिवस बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांचे गुरुवारी (दि. 11) हृषीकेश येथील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमच्या वतीने कनेक्टींग एनजीओच्या बॅनरखाली शुक्रवारी (दि. 12) निगडी प्राधिकरण येथे कँडल मार्च काढण्यात आला.

यामध्ये पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम, सावरकर मंडळ, जलबिरादरी, निसर्गराजा, जेष्ठ नागरिक संघ, पवना जल अभियान, पीसीसीएफ, आंघोळीची गोळी, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, पोलीस नागरिक मित्र तनपुरे फौंडेशन, संस्कार प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांनी भाग घेतला होता. संभाजी चौक ते भेळ चौक, निगडी प्राधिकरण या मार्गे हा कॅंडल मार्च काढण्यात आला.

गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकारकडून कोणत्याही उपायोजना न झाल्याच्या निषेधार्थ अग्रवाल हे 111 दिवस बेमुदत उपोषणाला बसले होते. त्यांची तब्येत ढासळल्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्याच ठिकाणी त्यांचे निधन झाले. गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.