Pune : डुप्लिकेट सॉफ्टवेअर तयार करून विकणा-या कार्यालयावर सायबर सेलचा छापा; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – डूप्लिकेट सॉफ्टवेअर तयार करून विकणा-या धनकवडी येथील के.के.मार्केट येथील पॅन गुरू सिस्टीम या कार्यालयावर सायबर सेलने छापा घालून मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजीनगर येथील समकन्सेप्टस् टेक्नॉलॉजीज प्रायवेट लिमिटेड या सॉफ्टवेअर कंपनीचे मालक बिरेन धरमसी यांनी फिर्याद दिली होती. महेश सोपान पवार व संतोष रतन गोसावी यांच्याविरूद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील समकन्सेप्टस् टेक्नॉलॉजिज प्रायवेट लिमिटेड या कंपनीकडे इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीचे शैक्षणिक ई-लर्निंग सॉफ्टवेअरचे कॉपीराईट्स असताना धनकवडी येथील के. के.मार्केट मधील एका गाळ्यामध्ये याच सॉफ्टवेअरचे सोर्स कोड चोरून त्यात अनधिकृतरित्या बदल करून ते बाजारात अधिक किंमतीने विकत असल्याची तक्रार सायबर क्राईम सेलकडे आल्यानंतर तक्रारीची पडताळणी करून ही तक्रार खरी असल्याचे उघडकीस आले.

त्यानुसार सापळा रचून बनावट ग्राहकाच्या साहाय्याने पॅन गुरू सिस्टीम या कार्यालयावर छापा टाकून एक डोंगल, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, 2 हार्डडिस्क, सॉफ्टवेअर खरेदी केल्याचे बिल व साडेसात हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला. सहकारनगर पोलीस तपस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.