Maval : तालुक्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी 73 लाखांचा निधी मंजूर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील आठ गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकासासाठी 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. (Maval) माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा निधी दिला. जांभूळ, डाहुली, कुसगाव पमा, चिखलसे, सोमाटणे, सुदवडी, इंदोरी, वेहेरगाव या गावातील विविध विकासकामे या निधीमधून केली जाणार आहेत.

Maval : सोमाटणे टोलनाका अनधिकृत आहे म्हणणे तहसीलदार यांना भोवले; मावळ मधून थेट गडचिरोलीला बदली

मावळ तालुक्यातील अनु.जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या विशेष प्रयत्नांतून एकूण 73 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. (Maval) पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दलित वस्तीचा आराखडा तयार करण्यात आला.,यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील दलित वस्तीचा विकास करण्याच्या हेतूने निधीची मागणी केली. त्यावर पहिल्या टप्पयात एकूण 73 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

 

रमाई घरकुल वसाहत (ग्रा.जांभूळ )नळ पाणी पुरवठा करणे – 15 लाख

ग्रामपंचायत डाहुली प्रकाश व्यवस्था करणे -3 लाख 99 हजार 832 रुपये

वाघजाई वस्ती (ग्रा.कुसगाव पमा) रस्ता करणे – 5 लाख

दलित वस्ती अहिरवाडे (ग्रा.चिखलसे )रस्ता करणे -10लक्ष

राजर्षी शाहूनगर (ग्रा.सोमाटणे) रस्ता करणे – 17 लाख

काळभोर दलित वस्ती (ग्रा.सुदवडी) बंदिस्त गटर करणे – 2 लाख 146 रुपये

दलित वस्ती क्र. 3 (ग्रा.इंदोरी) रस्ता करणे – 10 लाख

बौद्ध वस्ती (ग्रा.वेहेरगाव) नळ पाणी पुरवठा (पाण्याची टाकी) करणे – 10 लाख

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.