Pune : ‘ऑक्टोबर हिट’ने पुणेकरांची लाहीलाही !

एमपीसी न्यूज – परतीच्या पावसाची हुलकावणी आणि वाढत्या तापमानामुळे शहरात ‘ऑक्टोबर हीट’ जाणवू लागली आहे. रस्त्यावर फिरताना उन्हाचे चटके बसत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील तीन दिवसांपासून पुणे शहरातील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. रविवारी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे. मागील चोवीस तासांत कोकण – गोवा, मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्यात सर्वाधिक सोलापुर येथे 36.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर डहाणू येथे त्या खालोखाल 36.1 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.