Pune : शहरातील 826 किलोमीटर लांबीचे रस्ते विनाफुटपाथचे

एमपीसी न्यूज- पुणे शहरात सुमारे 1 हजार 400 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील फक्त 574 किलोमीटर रस्त्यावर फुटपाथ अस्तित्वात आहेत. त्यामुळे तब्बल 826 किलोमीटर लांबीचे रस्ते विनाफुटपाथ असल्याची माहिती उघडकीस आली आहे. काँग्रेसचे नगरसेवक आबा बागुल यांनी विचारलेल्या प्रश्नाला पालिका प्रशासनाने लेखी उत्तर दिले आहे.

शहरातील रस्ते हे पुणे महापालिकेच्या मालकीचे आहेत. पुणे पालिका हद्दीतून जाणाच्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाची मालकी ही राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मालकीची आहेत. शहरातील फुटपाथवर राज्य विद्युत वितरण कंपनीने किती ठिकाणी डीपी बसविले आहेत. त्याची माहिती देणे अवघड आहे असे पालिका प्रशासनाने दिलेल्या उत्तरामध्ये म्हटले आहे.

शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर फुटपाथ आहेत. पण काही रस्त्यांवर तुटक स्वरूपाचे फुटपाथ आहेत. ही वस्तुस्थिती आहे. शहरात सुमारे 1 हजार 400 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यातील फक्त 574 किलोमीटर रस्त्यांवर फुटपाथ अस्तित्वात आहेत. त्यात मुख्य रस्त्यावरील फुटपाथची लांबी चारशे किलोमीटर आहे. नियमानुसार फुटपाथची रुंदी किमान 1.8 मीटर आणि रस्त्यापासून फुटपाथ 150 मि.मी उंच असणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या पातळीनुसार अपवादात्मक परिस्थितीत नियमापेक्षा उंच असल्यास रॅम्प किंवा पाय-यांची रचना करण्यात येते, असे उत्तर पालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी आबा बागुल यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.