Chikhali: नवरात्री निमित्त पूर्णानगरमध्ये घुमतोय रास दांडियाचा जागर

एमपीसी न्यूज – ‘हे नाम रे सबसे बडा तेरा नाम…, ‘आजा सनम मधुर चांदनी मे’.., ‘चाँद आया है जमी पर, आज गरबे की रात मे’.. या गाण्यांवर दांडिया प्रेमींनी ठेका घेताच पूर्णानगर येथे नवरात्र महोत्सवात दांडिया स्पर्धेची रंगत वाढली. यामध्ये तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. त्याचप्रमाणे उत्साहाने नृत्यामध्ये भाग घेण्यात बालचमूही आघाडीवर आहेत.

चिखलीतील प्रभाग क्रमांक 11 पूर्णानगर येथे श्री सिद्धिविनायक नवरात्र उत्सव आणि महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील धनश्री काडगावकर, अभिनेत्री श्वेता महेंदळे, मृणाल कुलकर्णी, क्रीडा समितीचे सभापती संजय नेवाळे, स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, विक्रमादित्य पवार, भाजपचे सांगवी मंडलाध्यक्ष अरुण पवार, सुभाष आहेर, कविता हिंगे, अतुल माने, संदीप मंगवडे, संतोष ठाकुर, अनिल माने, शिवाजी कणसे, रवी पाटील, बाळासाहेब गंगावणे, गोरख पाटील, निलेश सुंभे, नागेश शेट्टी, सिद्धिविनायक नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

एकत्र सण साजरा करण्यात ख-या अर्थाने आनंद असतो. उत्सवाच्या माध्यमातून येथील रहिवाशांनी एकत्र येवून सण साजरे केले पाहिजेत. या महोत्सवाच्या माध्यमातून पूर्णानगरवासियांना सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. उद्योगनरीमध्ये अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना आनंदाचे सोने लुटा, असे आवाहन अभिनेत्री धनश्री काडगावकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.