Chinchwad: चिंचवड मतदारसंघात रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगामार्फत छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी(दि.21) विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगामार्फत 1/1/2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. येत्या रविवारी (दि. 21) आणि पुढील रविवारी (दि.28) विशेष मोहिमेअंतर्गत महिला, 18 वर्षावरील नव मतदार व दिव्यांग मतदार यांच्यासाठी 205 चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व मतदार संघातील सर्व मतदार मदत केंद्रांवर फॉर्म नं. 6,7,8 व 8 ‘अ’ चे फॉर्म स्वीकारण्याचे कामकाज करण्यात येणार आहे.

मतदार मदत केंद्रे पुढीलप्रमाणे:- मतदार नोंदणी अधिकारी, 205 चिंचवड विधानसभा मतदार संघ यांचे कार्यालय, यशवंतराव चव्हाण शैक्षणिक संकुल, दुसरा मजला, थेरगांव, पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्य इमारत, करआकारणी व करसंकलन विभाग, ‘ब’ ‘ड’ आणि ‘ह’ क्षेत्रीय कार्यालय त्याचप्रमाणे सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना पात्र नागरिकांकडून फॉर्म नं. 6 स्वीकारण्याबाबत कळविण्यात आले आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघात रविवारी या कार्यालयामार्फत शनिवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदार नोंदणी विशेष मोहिम आयोजित केली आहे. जास्तीत-जास्त पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज जमा करावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी दिलीप गावडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.