Vadgaon Maval : ज्योती नलावडे ठरल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धा -2018 च्या ‘महादुर्गा’

एमपीसी न्यूज- नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मी दुर्गा बेस्ट सेल्फी स्पर्धेमध्ये वडगाव मावळ येथील ज्योती महादेव नलावडे या स्पर्धेच्या ‘महादुर्गा’ ठरल्या. नलावडे यांना मानाची पैठणी व सन्मानचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

नवरात्र उत्सवाच्या दरम्यान नगरसेविका सायली रूपेश म्हाळसकर यांच्या वतीने प्रभाग क्र -१६ मधील महिलांसाठी ‘मी दुर्गा …. बेस्ट सेल्फी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देवीने परिधान केलेल्या नऊ दिवसांत नऊ रंगाच्या साडी महिलांनी परिधान करुन रोज एक आकर्षक सेल्फी फोटो काढून whatsapp द्वारे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल 49 महिलांनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार दसऱ्याच्या दिवशी गुरुवारी( दि 18) पडला. या पैकी नऊ दिवसांत सेल्फी फोटो पाठवणाऱ्या नऊ वेगवेगळ्या महिलांना सोन्याची नथ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेत राधा कारंडे, मनीषा काकडे, शर्मिला वाबळे, अंजली जोशी, ज्योती नलावडे, प्रेमा जमदाडे, दिपाली फुसे, पुनम म्हाळसकर, सुनीता तरळकर या महिला नऊ दिवसाच्या नऊ ” दुर्गा ” ठरल्या तर नऊ दुर्गांपैकी लकी ड्रा पद्धतीने ज्योती महादेव नलावडे ह्या स्पर्धेच्या ” महादुर्गा ” ठरल्या त्यांना मानाची पैठणी व सन्मानचिन्ह बक्षीस स्वरूपात देण्यात आले.

तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना यावेळी आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेविका हेमलता खळदे, प्रमिला बाफना, पूजा वहिले, पूनम जाधव, शारदा ढोरे उपस्थित होत्या. स्पर्धेचे आयोजन आरती म्हाळसकर, साक्षी म्हाळसकर, पल्लवी वारींगे, अनिता शिवेकर, नेहा म्हाळसकर, मोहिनी म्हाळसकर, वर्षा म्हाळसकर, रेणुका म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सोनल शिवेकर, सुवर्णा बैयकर, सुषमा गवारी, सुषमा म्हाळसकर, ऐश्वर्या म्हाळसकर व आदी महिलांनी केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.