_MPC_DIR_MPU_III

Vadgaon Maval : शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी 73 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात

एमपीसी न्यूज – मावळ तहसील कार्यालय, पंचायत समिती, न्यायालय, पोलीस स्टेशन, नगरपंचायत, भूमि अभिलेख, भाजप कार्यालय, शाळा व महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी ७३ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी देशभक्ती गीत, प्रभात फेरी, सांस्कृतिक कार्यक्रम, जागोजागी खाऊ वाटप करण्यात आला. शासकीय इमारतींना आकर्षक विद्युतीकरण करण्यात आले. वडगाव येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी राजकीय, सामाजिक, एतिहासिक पुरुषांचे तसेच शेतकरी वेष परिधान केल्याने उपस्थितांचे आकर्षण ठरले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्शभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. काहींनी सांगली-कोल्हापूर पूरग्रस्तांना भरघोस मदत दिली. पूरातील मृतांना भावपूर्व श्रद्धांजली वाहिली. काही ठिकाणी कलम ३७० व ३५ अ हटवल्याने जल्लोष केला.

_MPC_DIR_MPU_IV

१) मावळ तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहन मावळ मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी वडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहाय्यक निरीक्षक नितीन नम, उपनिरीक्षक दिलीप देसाई यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक गुरुकुल प्रमुख आत्माराम मोरे व गणेश शेडगे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गीत गायन केले. विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून संविधान, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण व पर्यावरण आदि विषयी जनजागृती करून तसेच शिवकालीन मर्दानी ढोल लेझीम पथकाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी उपस्थितांना अल्पोपहार वाटप करण्यात आला. माजी राज्यमंत्री मदन बाफना, माजी आमदार दिगंबर भेगडे, रूपलेखा ढोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, भाजप तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजप प्रभारी भास्कर म्हाळसकर, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, समीर यादव, आर एल कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले, महेश पाटील, उप अभियंता राकेश सोनवणे, धनंजय पाटील, मंडलाधिकारी संदीप बोरकर, मुकुंद खोमणे, बजरंग मेकाले, माणिक साबळे, प्रकाश बलकवडे, गणेश जाधव, कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

२) मावळ पंचायत समिती कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन सभापती सुवर्णा कुंभार, यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गीत गायन केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी ल्क्ष्मण वाजे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, अलका धानिवले, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती राजाराम शिंदे, माजी उपसभापती गणेश गायकवाड, सदस्य निकिता घोटकुले, साहेबराव कारके, ज्योती शिंदे, दत्तात्रय शेवाळे, उप अभियंता धनंजय पाटील, महेंद्र वासनिक, कक्षाधिकारी विठ्ठल भोईर, डॉ. चंद्रकांत लोहारे, डॉ. अंकुश देशपांडे, गट शिक्षण अधिकारी मंगल वाव्हळ, विस्तार अधिकारी महादेव कांबळे, बाळासाहेब दरवडे, कृषी अधिकारी संताजी जाधव, कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

३) वडगाव मावळ न्यायालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन मुख्य न्यायाधीश आर डी डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. वडगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सशस्त्र मानवंदना दिली. विद्यार्थी व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी न्यायाधीश पी एम सूर्यवंशी, बी व्ही बुरांडे, एस ए मुळीक, आर के गायकवाड, ए डी जतकर, वरिष्ठ न्यायाधीश पी जी देशमुख, बार असोसिएशन अध्यक्ष तुकराम काटे, उपाध्यक्ष सुरेंद्रनाथ दाभाडे, सचिव महेंद्र खांदवे, जयश्री शितोळे, खजिनदार दीपक वाकडे, प्रफुल्ल लुंकड, सदस्य विश्वनाथ जाधव, अमोल दाभाडे, सुभाष तुपे, सुप्रिया तिखे, संकेत शिंदे, विदुला वर्तक न्यायालयीन कर्मचारी, सर्व वकील व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

४) वडगाव मावळ भूमि अभिलेख कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन उपअधीक्षक उर्मिला गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गीत गायन केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. याप्रसंगी विठ्ठल गणेशकर, काशिनाथ भोईर, विनायक वाघचौरे, बी के करवंदे, एस बी हुलावळे, महेश माने, एस बी कुंभार, एस बी सोरटे, परेश दाभाडे कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

५) वडगाव नगरपंचायत कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व समूह गीत गायन केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष राहुल ढोरे, माजी उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, नगरसेवक दशरथ केंगले, दिनेश ढोरे, शारदा ढोरे, राहुल ढोरे,पूनम जाधव, पूजा वहिले, चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, प्रवीण चव्हाण, प्रमिला बाफना, किरण म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिपाली मोरे, राजेंद्र कुडे, सायली म्हाळसकर, अॅड. विजय जाधव व सुनील ढोरे आदि उपस्थित होते. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, भाजप तालुका प्रभारी भास्कराव म्हाळसकर, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, सुनील ढोरे, प्रकाश कुडे, विशाल वहिले, अनंता कुडे, कर्मचारी, बहुसंख्य विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

६) वडगाव पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त होणार्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याची प्रथा सुरु होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सशस्त्र मानवंदना देऊन परेड केली. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले. यावेळी पोलीस अधिकारी नितीन नम, दिलीप देसाई, कर्मचारी संपत गायकवाड, गणेश तावरे, भाऊसाहेब कर्डिले, संपत पाटोळे, राजेश पवार, अमोल तावरे, मनोज कदम, व बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते.

७) वडगाव होमगार्ड कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहन होमगार्ड तालुका समादेशक मधुकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होमगार्ड जवानांनी ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन केले होमगार्ड जवानांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेड सादर केली. सेवानिवृत्त होमगार्ड मंगेश शौरी लिंगवत, शांताबाई बोडके, भरत लालगुडे, प्रकाश मोरे, राजू वाघोले यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ६० होमगार्ड व ग्रामस्थ उपस्थित होते.

८ ) वडगाव मावळ भाजप तालुका कार्यालय येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीबहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्ते उपस्थित होते.

९ ) रमेशकुमार साहानी इंग्लिश स्कूल येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मयूर ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर समूहगीत गायन केले. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून संविधान, अंधश्रद्धा, स्त्रीभ्रूणहत्या, शिक्षण व पर्यावरण आदि विषयी जनजागृती करून तसेच शिवकालीन मर्दानी ढोल लेझीम पथकाचा कार्यक्रम सादर केला विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. याप्रसंगी माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे, गंगाराम ढोरे, नारायण ढोरे, नंदकुमार ढोरे, राजेंद्र वहिले, दिलीप वहिले, डॉ. सुनिल बाफना , प्राचार्य टी एम साईलक्ष्मी,शिक्षक , विद्यार्थी, व ग्रामस्थ उपस्थित होते.

१०) रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन प्राचार्य उद्धव होळकर, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर समूहगीत गायन केले. विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या गजरासह , राष्ट्रपुरुषांच्या तसेच समाज प्रबोधनाच्या घोषणा देत वडगाव शहरातून प्रभात फेरी काढली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. उपप्राचार्य शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांना देशभक्तीविषयी मार्गदर्शन केले.

याप्रसंगी स्कूल कमिटी सदस्य मानिज ढोरे, उपप्राचार्य मृणालिनी अनारसे, पर्यवेक्षक पोपट कांबळे, गुरुकुल प्रमुख आत्माराम मोरे, क्रीडा शिक्षक गणेश शेंडगे, नीलिमा पाटील, सोनाली मुंगूसकर, सुरेश शेंडगे, दिनकर साठे, चंद्रकांत मगर, संजय दिवेकर, अजयकुमार महामुनी, वनराज ढोरे, दिनेश मोरमारे, दिलीप शेलार, दीपक निगडे, यश श्रीरंग ढोरे, सुमित गव्हाणे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते

११) श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या डी एड्, बी एड्, व कला वाणिज्य महविद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डी एड्, बी एड्, व कला वाणिज्य महविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्ती समूहगीत गायन केले. देशभक्तीपर गीतावरवैयक्तिक व सामुहिक नृत्य, पोवाडा तसेच समाज प्रबोधन व अंधश्रध्दा निमुर्लन या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. विद्या येवले या विद्यार्थिनीने भाषण केले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम आसवले, उपाध्यक्ष बंडोबा मालपोटे, सचिव अशोक बाफना, नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, ज्येष्ठ नेते सुभाष जाधव, मंगेश ढोरे, सुनील ढोरे, राजेंद्र कुडे, विशाल वहिले, सिद्धेश ढोरे, प्रवीण ढोरे, प्राचार्य डॉ. राजेंद्र जाधवर, प्राचार्य रवींद्र मिस्त्री, हिरामण लंघे, प्रा. महादेव वाघमारे, प्रा. अशोक गायकवाड, प्रा. महादेव सांगळे, प्रा. मनोज गायकवाड, प्रा. राजेंद्र डोके, अनिल कोद्रे, बहुसंख्य शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.