Pimpri News : पंप हाऊसमध्ये पंपींग मशीनरी बसविण्यासाठी 74 लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज : पाणीपुरवठा विभागाकडील पिंपरी येथील नियोजित पंप हाऊसमध्ये पंपींग मशीनरी बसविणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी 74 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे 49 कोटी 47  लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रभाग क्रमांक 13  साईनाथनगर आणि इतर ठिकाणच्या अंतर्गत रस्त्यांची पातळी कमी करून रस्ते विकसीत करण्यासाठी 1 कोटी 5 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. अशुध्द जल उपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्रमांक 3 योजनेअंतर्गत दाबनलिकेवरील नादुरूस्त स्लुस व्हॉल्व्ह बदलण्यात येणार आहे. यासाठी 30 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

महापालिका हद्दीतील रस्त्यामुळे अथवा आरक्षणाने बाधित झालेले काही ठिकाणचे क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात घेण्यात येणार आहे.  यासाठी खासगी वाटाघाटी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.  मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणाने बाधित क्षेत्राचा मोबदला संबंधित मिळकतधारकास खाजगी वाटाघाटीने देण्यास या समितीने मंजूरी दिली.

त्यानुसार मौजे रहाटणी, मौजे पिंपरी, मौजे चिंचवड, मौजे पिंपळेगुरव, मौजे च-होली, मौजे पिंपळे सौदागर आणि मौजे पिंपरी वाघेरे येथील मिळकतधारकांना सुमारे 14 कोटी रुपये दिले जाणार आहेत. या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

प्रभाग क्रमांक 30 मधील आवश्यक ठिकाणी मलनि:सारण नलिका आणि चेंबरची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी  29 लाख रुपये तर इ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक 3 मोशी च-होली मधील मलनि:सारण नलिका आणि चेंबरची देखभाल दुरूस्ती करण्यासाठी  25 लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्रमांक 18 मधील सांस्कृतिक भवन इमारतीची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी 21 लाख रुपये तर चिंचवड काळेवाडी पूलापासून भाटनगर एसटीपी पर्यंत 18 मीटर रस्त्याचे नदीच्या कडेला बंधारा भिंत बांधण्याकामी 5 कोटी 82 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

अशुध्द जलउपसा केंद्र रावेत येथील टप्पा क्र. 3 आणि 4 योजनेअंतर्गत 2020-21 कालावधीकरीता पंपींग मशिनरीची दुरुस्ती विषयक कामे करणे आणि अनुषंगिक कामे करण्यासाठी 53 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. प्रभाग क्रमांक 15 मधील रोड फर्निचर विषयक कामे करण्यासाठी 22 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 29 पिंपळेगुरव येथील गंगोत्रीनगर, विजयनगर आणि प्रभागातील इतर भागात पाथवे, फुटपाथ, स्टॉर्म वॉटर लाईन आदीसाठी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यासाठी 20 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  तर, प्रभाग क्रमांक 15 मध्ये फुटपाथ विषयक कामे करण्यासाठी 25  लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.  या खर्चास देखील स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like