Pune : पुण्यात भरणार पाचवे अखिल भारतीय विडिओ फोटो प्रदर्शन

एमपीसी न्यूज – कॅवॉक सर्विसेस तर्फे पुण्यात ‘पुणे फोटो फेयर 2018’ या पाचव्या अखिल भारतीय विडिओ फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन शुक्रवार (दि. 26) ते रविवार (दि. 28) दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 11 ते 7 या वेळेत होणार आहे. छायाचित्र आणि छायाचित्रण या विषयाशी निगडीत या प्रदर्शनामध्ये पुणे, मुंबई, कोल्हापुर, सांगली, रत्नागिरी, सोलापूर, बार्शी, नाशिक तसेच गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, चेन्नई, बंगळूरु, केरळ इत्यादी ठिकाणचे छायाचित्रकार तसेच छायाचित्रण क्षेत्रातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे फोटो फेयरचे अनिल जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फोटोग्राफी व छायाचित्रण विषयीची सर्व साहित्य सामुग्री या प्रदर्शनामध्ये पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. फोटो व विडिओ कॅमेरा, फोटो एडिटिंगचे सॉफ्टवेअर व हार्डवेअर, इंस्टन्ट फोटो प्रिंटर, वीडियो मिक्सर, जिमिजीप, क्रेन्स, कॉपटर्स, ट्रायपॉड्स अशा कित्येक आधुनिक प्रणालींचा समावेश असलेल्या सामुग्री या प्रदर्शनाचं वैशिठ्य ठरणार आहेत.

प्रदर्शनाच्या ठिकाणी ‘मॉडेल फोटो शूट’, बेसिक छायाचित्रण तसेच अत्याधुनिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेर्‍याचा वापर, हाताळणी या विषयी कार्यशाळा तसेच चित्रिकरणाची अत्याधुनिक सामुग्री वापराविषयी प्रात्यक्षिके असणार आहेत. पुण्यातील एका कंपनीने बनवलेला यंत्र मानव हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे. या रोबॉट कडून फोटो काढून घेण्याची तसेच त्याच्याशी संवाद साधण्याची संधीही या प्रदर्शनात मिळणार आहे. प्रदर्शनात प्रत्येक तासाला लकी ड्रा काढण्यात येणार असल्याने विविध बक्षिसे मिळवण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे. परंतु त्यासाठी punephotofair.in या संकेतस्थळावर केवळ नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.