Wakad : जुनी गाडी विकत घेताय, थांबा… वाहनाबाबत माहिती पडताळून घ्या !

जुने वाहन खरेदी करताना वाहनाविषयी माहिती घेण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन

एमपीसी न्यूज – आपण जर जुनी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी किंवा अन्य कोणतेही वाहन विकत घेत असाल तर थांबा. आपण घेत असलेल्या वाहनावर किती गुन्हे दाखल आहेत, किती दंड थकीत आहे याची चौकशी करा आणि मगच पुढील व्यवहार करा, असे आवाहन पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी केले.

कोणतेही जुने वाहन खरेदी करत असाल तर नागरिकांनी सावध राहायला हवे. जे वाहन खरेदी करत आहोत, त्या वाहनावर कोणत्या प्रकारची कारवाई झाली आहे का? ते वाहन चोरीचे आहे का? वाहन आणि वाहन मालक यांच्यावर किती दंड ठोठावला आहे? याबाबतची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय वाहन खरेदी करणे चुकीचे आहे. खाजगी आणि व्यावसायिक कोणत्याही प्रकारचे वाहन खरेदी करताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच वाहन खरेदी करावे.

खाजगी वाहन खरेदी करताना त्या वाहनाचे आर सी, टी सी, इन्शुरन्स इत्यादी कागदपत्रांची वाहन मालकाकडे मागणी करावी. त्याबरोबरच वाहतूक विभागात जाऊन संबंधित वाहनावर किती दंड शिल्लक आहे, याबाबतची चौकशी करावी. जर दंड शिल्लक असेल तर दंडाची रक्कम पूर्ण भरल्याशिवाय मालकी हक्क बदलता येणार नाही. दंड माहिती करून घेण्यासाठी पुणे पोलिसांनी ‘ई-चलन पुणे’ हे मोबाईल अॅप्लिकेशन सुरु केले आहे. याद्वारे देखील दंडासंबंधी माहिती मिळू शकते. व्यावसायिक वाहन खरेदी करताना वाहनाचा फिटनेस, टॅक्स, इन्शुरन्स, आर सी इत्यादी कागदपत्रे व्हॅलिड आहेत का ? याची चौकशी करावी. ही कागदपत्रे व्हॅलिड असल्यास त्या वाहनावर कोणता दंड शिल्लक आहे का ? याबाबतची माहिती वाहतूक विभाग किंवा ई-चलन पुणे या अॅप्लिकेशनवर जाऊन तपासून घ्यावे.

पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन म्हणाले, “वाहनाविषयी पूर्ण माहिती घेऊन खरेदी केल्यास वाहन घेणे सुरक्षित आहे. अन्यथा आपण खरेदी केलेले वाहन चोरीचे असून शकते. जर वाहन चोरीचे असेल तर वाहनाचा जो वापर करतो त्याच्यावर देखील कारवाई होऊ शकते. कमी पैशांमध्ये वाहन मिळत आहे म्हणून घाई न करता त्याबाबत संशय आल्यास पोलिसांना माहिती द्या. वाहन खरेदी करताना संपूर्ण कायदेशीर बाबी पूर्ण करा”

ई-चलन अॅप्लिकेशन कसे वापराल –
# प्ले स्टोअर मधून ‘E-Challan Pune’ अॅप्लिकेशन डाउनलोड करा
# ‘E-Challan’ ऑप्शन मध्ये जा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.