Pune : कटिंग दाढीच्या दरात वाढ; कटिंग 100 रुपये तर दाढी 50 रुपये

एमपीसी न्यूज- पुणेकरांना आता केशकर्तन आणि दाढी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. 1 नोव्हेंबरपासून कटिंग करण्यासाठी 100 रुपये, तर दाढी करण्यासाठी 50 रुपये द्यावे लागणार आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या पुणे शहराच्या विशेष सर्वसाधारण सभेत कटिंग व दाढीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कटिंग करण्यासाठी 80 रुपये व दाढी करण्यासाठी 40 रुपये आकारले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.