Vadgaon Maval : सुमित्रा काळे ठरल्या पैठणीच्या मानकरी

एमपीसी न्यूज- जय मल्हार ग्रुप व अंबिका मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सावानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रासगरबा, दांडिया,खेळ रंगला पैठणीचा, लकी ड्राॅ कुपन स्पर्धा घेण्यात आल्या. महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ मध्ये सुमित्रा काळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेत 700 महिलांनी सहभाग घेतला.

महिलांसाठी ‘खेळ रंगला पैठणीचा’ मध्ये सुमित्रा काळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सुनीता हेळमकर यांनी द्वितीय तर शबाना शेख यांनी तृतीय क्रमांक पटकावला. जयश्री शेलार, सपना भोकरे, कविता उघडे यांना उत्तेजनार्थ तर विशेष जेष्ठ महिला ठरल्या गजाबाई राणु चव्हाण.

लकी ड्राॅ कुपन स्पर्धेमध्ये सुमारे दीड हजार महिला व पुरूषांनी सहभाग नोंदवला. यामध्ये गृहपयोगी ४० भेटवस्तु देण्यात आल्या. त्याचबरोबर रासगरबा दांडिया व फॅन्सी ड्रेस स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळाला.

यावेळी तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष अर्चना म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव, नगरसेवक राजेंद्र कुडे, दिलीप म्हाळसकर, राहुल ढोरे, विजय जाधव, चंद्रजित वाघमारे, नगरसेविका शारदा ढोरे, पूनम जाधव, सुनीता भिलारे, पूजा वहिले, प्रमिला बाफना, माया चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य सुधीर वहिले, संतोष खैरे, महावीर दुबे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन उपसरपंच विशाल वहिले, मंगेश खैरे, आफताब सय्यद, तुषार वहिले, संतोष पवार, लौकीक सासवडकर, रोहित गिरमे, स्वप्निल वाघमारे, प्रमोद नवघणे, नितीन जाधव, सोनु पिंजण, महिला सभासद सुषमा जैन, कीर्ती वहिले, प्रियांका खैरे, अश्विनी पवार, रूपाली खैरे, प्रमिला वहिले आदींनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.