India Corona Update : देशात गेल्या 24 तासांत दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद 

75 लाख लोकांचे झाले लसीकरण,

एमपीसी न्यूज – देशात दोन लसीच्या वापराला परवानगी दिल्या नंतर 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत आता पर्यंत देशात 75 लाख पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. दुसरीकडे नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या कमी झाली असून, गेल्या 24 तासांत देशभरात दहा हजारांहून कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 

आरोग्य मंत्रालाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 9 हजार 309 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून, 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 08 लाख 80 हजार 603 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 05 लाख 89 हजार 230 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 15 हजार 858 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशाचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के एवढा असून, देशात सध्याच्या घडीला 1 लाख 35 हजार 926 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएआरने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 20 कोटी 47 लाख 89 हजार 784 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 7 लाख 65 हजार 944 नमून्यांची तपासणी गुरुवारी (दि.11) करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत देशभरात 87 रुग्णांचा मृत्यू झाला असून, देशातील मृतांची संख्या 1 लाख 55 हजार 447 एवढी झाली आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.43 टक्के एवढा आहे‌. देशात 75 लाख आरोग्य सेवक आणि फ्रन्ट लाईन कर्मचारी यांनी लस घेतली आहे. गुजरात राज्यात सर्वाधिक 6.43 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 6 लाख जणांना लस टोचण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.