Pimpri : महापालिकेसमोर पीएमपीएमएल बस बंद; वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बस बंद पडली. भर रस्त्यात बस बंद पडल्यामुळे वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

निगडी – मनपा बस (एम एच 14 / सी डब्ल्यू 3128) बस निगडीहून बारा वाजता निघाली. साडेबारा वाजता पिंपरी चिंचवड महापालिका भवन बस थांब्याजवळ बस आली असता बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे बस अचानक बंद पडली. दरम्यान बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. बस बंद पडल्यामुळे प्रवाशांची पुढील प्रवासाची सोय करून देण्यात आली.

दरम्यान, चालकाने निगडी डेपोला घटनेची माहिती दिली. बस थांब्याजवळ बस बंद पडल्यामुळे बस थांब्यावर अन्य बसना थांबण्यास अडथळा होत आहे. बस थांब्याच्या दुसऱ्या बाजूला मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ता अरुंद झाला आहे. यातूनही वाहनचालक रस्ता काढून प्रवास करत आहेत. वाहतूक पोलिसांनी काही वेळेत वाहतूक सुरळीत केली आहे. वारंवार बंद पडणाऱ्या बसमुळे सार्वजनिक वाहतूक सेवा कोलमडलेली दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.