Lonavala : वीज व ढगांच्या गडगटासह लोणावळ्यात पहाटे जोरदार पाऊस

455

एमपीसी न्यूज- आज सोमवारी पहाटे पावणेचार वाजल्यापासून लोणावळा शहर व परिसरात विजाचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. चार तासात शहरात 35 मिमी पावसाची नोंद झाली.

HB_POST_INPOST_R_A

मागील दोन दिवसांपासून वातावरणात ऊष्मा वाढायला सुरुवात झाली होती. ऐन दिवाळीत अवकाळी पावसाचा तडाखा बसणार अशी शक्यता व्यक्त होत असताना रविवारी सायंकाळच्या सुमारास म‍ावळात वीज वारा व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. यावेळीवीज पडल्याने खांडशी येथे दोन व कचरेवाडी येथे एक अशा तीन शेतकर्‍यांचा जीव गेला.

ऐन दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या घटना घडल्याने या दोन्ही ग‍ावांसह मावळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. रात्री काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाला आज पहाटे पावणेचार वाजता पुन्हा जोरदार गडगडाटासह सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजेपर्यत पाऊस सुरु होता. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. मावळात सध्या सर्वत्र भात कापणीची कामे सुरु आहेत. पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावर्षीच्या पावसाच्या लहरीपणाचा भाताला फटका बसलेला असताना हातातोंडाशी आलेले दाणे देखील पावसाने काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: