Pimpri: बेकायदेशीर फटाका स्टॉल्सवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विना परवाना बेकायदेशीररित्या फटाका स्टॉल्स उभारल्याचा आरोप करत या स्टॉल्सवर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय गणराज्य पार्टीच्या वतीने करण्यात आली.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, शहरामध्ये फटाका विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात स्टॉल उभारण्यात आले आहेत. यापैकी बुहतेक स्टॉल्स लोकवस्तीच्या भागांमध्ये आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेले स्टॉल्सचे मालक कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता फटाका विक्री करत आहेत. या फटाका स्टॉल्समध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिलेला परवाना कुठेही दर्शनी भागात लावण्यात येत नाही.

या फटाका स्टॉलमध्ये अग्निरोधक उपकरणांची उपलब्धता नसते. त्याचप्रमाणे असल्यास अगदी नगण्य असते. या फटाका स्टॉलमध्ये अग्निशामक दलाचा परवाना इत्यादी कोणत्याही स्वरुपातील परवाने दर्शनी भागावरती लावलेले नसतात. केवळ परवान्याच्या बरोबर अटी आणि शर्तीचा कागद जोडलेला असतो. बेकायदेशीर रित्या स्टॉल्स लावणा-यांवर तातडीने कारवाई करावी, अशी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.