BNR-HDR-TOP-Mobile

Vadgaon Maval : अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी

269
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- मावळमध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त झालेल्या भातपिकांचे पंचनामे त्वरित करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वडगाव मावळचे तसीलदार यांना देण्यात आले.

मावळमध्ये रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने वीज कोसळून नाणे मावळमधील नेसावे गावातील शोभा अंकुश शिरसट व खंडु धोंडू शिरसट व कचरेवाडी येथील सुनंदा भाऊ कचरे या शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाने भातपिकांचे नुकसान होतांना पाहून मानसिक धक्का बसून हृदयविकाराच्या झटक्याने भोयरे सोसायटीचे चेअरमन संतुजी भोईरकर यांचेही निधन झाले, तर कोंडीवडे येथील शेतकरी प्रकाश खरमारे विजेच्या धक्क्यामुळे जखमी झाले.

नुकसानग्रस्त झालेल्या भातपिकांचे पंचनामे त्वरित करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन वडगाव मावळचे तसीलदार यांना देण्यात आले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष बबनराव भेगडे, नगरसेवक किशोर भेगडे, अंकुशआबेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल दाभाडे, कैलास गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस संघटन मंत्री नारायणराव ठाकर, राष्ट्रवादी काँग्रेस तळेगाव शहराध्यक्ष अशिष खाडगे, चंद्रकांत दाभाडे, स्वामी गायकवाड, कैलास खाडभोर, भाऊ ढोरे, चन्द्रशेखर परचंड, विठ्ठल जाधव, गोरख बांगर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.