Maval News : डाहुली ग्रामपंचायत क्षेत्रात उत्साहात 75 वा स्वतंत्र दिवस साजरा

एमपीसी न्यूज : ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री. नामदेवराव शेलार, उपसरपंच सौ. संगीता पिंगळे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. वैजंती आलम, सौ. अंजना ठिकडे, श्री. बळीराम वाडेकर, सौ. जनाबाई कुडे, सौ.पूजा पिंगळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, ग्रापंचायत सदस्य, सरपंच, पोलीस पाटील, गावातील जेष्ठ वडीलधारी मंडळी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येक गावातील जिल्हापरिषद शाळेत शिक्षण समिती चे अध्यक्ष-उपाध्यक्ष, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

डाहुली येथे जिल्हापरिषद शाळा आणि ग्रामपंचायत कार्यालयाचे एकत्रित ध्वजारोहण करण्यात आले. वहानगाव येथील भैरवनाथ विद्यामंदीर येथे चित्रपट निर्माते श्री. विदू विनोद चोप्रा सर, श्री. राजकुमार हिराणी सर, श्री. अभिजित जोशी सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आंदर मावळात गोरगरीब जनतेची वैद्यकीय गैरसोय होत आहे. त्याचबरोबर वाढते पर्यटन पाहता स्थानिक ग्रामस्थांना संरक्षणाची नितांत गरज आहे. आपण ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली असता आज स्वतः ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहून चित्रपट निर्माते श्री. विदू विनोद चोप्रा यांनी मुलांच्या सोयीसाठी स्वखर्चाने प्रशस्त सभागृह उभारून देणार तसेच उत्कृष्ट आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी शालेय शिष्यवृत्ती देणार असल्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत प्रशस्त ग्रामीण रुग्णालय व संरक्षणार्थ पोलीस चौकी उभारून देण्याचे मान्य केले.

श्री.राजकुमार हिराणी सर, श्री.अभिजीत जोशी सर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांचा वहानगाव चे ग्रामस्थ मा.सरपंच श्री.निवृत्ती वाडेकर,सरपंच नामदेवराव शेलार यांनी सन्मान केला व मदतीसाठी आभार व्यक्त केले.

वहानगाव येथील भैरवनाथ विद्यामंदिराचा निकाल गेले 12 वर्ष 100% लागत असल्याचे सर्वांच्या निदर्शनास आणून देऊन मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे सरपंच नामदेवराव शेलार यांनी विशेष कौतुक केले.

कांब्रे, बोरवली, डाहुली, वहानगाव, कांब्रे पठार, बेंदेवाडी या शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या भवितव्यासाठी नेहमी कार्यतत्पर राहणार असून, आंदर मावळातील पश्चिम भागातील कमी सुविधा असून देखील आपलं उत्कृष्ट अध्ययन करत असलेल्या सर्व कर्तव्यदक्ष शिक्षकांना नेहमी प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही सर्व विद्यमान महिला सदस्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.