75th Independence Day : लाल किल्ल्यावर अशी सुरू आहे स्वातंत्र्यदिनाची तयारी (पहा खास फोटो)

एमपीसी न्यूज – भारताचा येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे. सरकारच्या वतीने हा स्वातंत्र्यदिन ‘आझादी का अमृतमोहत्सव’ म्हणून साजरा केला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर कशा पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा होणार तसेच सैन्यसंचलन याचा सराव दरम्यानचे काही खास फोटो समोर आले आहेत.

भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दिल्लीतील लाल किल्ल्यावर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वी मागील काही दिवसांपासून लाल किल्ल्यावर सैन्यसंचलन आणि हवाई दलाचा सराव सुरू आहे. आज (शुक्रवारी, दि. 13) झालेल्या सरावाचे फोटो संरक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.