Wakad : थेरगावात दोन ठिकाणी घरफोडया

एमपीसी न्यूज – दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी एकाच सोसायटीतील दोन फ्लॅटमध्ये चोरी केली. ही घटना बुधवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास  उघडकीस आली. 
या प्रकरणी सचिन बाळासाहेब सूर्यवंशी (वय 34, अभिजित पार्क, वनदेवनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सूर्यवंशी घरात नसताना चोरटयांनी दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला. चोरटयांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. तसेच याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या स्वप्नील सुरेश फंड यांच्या घरात देखील चोरटयांनी हात साफ केला. या दोन्ही ठिकाणाहून एकूण 71 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.