BNR-HDR-TOP-Mobile

Chakan : जमिनीच्या वादातून दोन गटात भांडण; परस्पर विरोधी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जमिनीच्या वादातून दोन गटात भांडण झाले. यातून दोन्ही गटांनी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. ही घटना बुधवारी (दि. 14) रात्री साडेआठच्या सुमारास चाकण येथील पवारवाडी येथे घडली.

किसन गणपत पवार (वय 50, रा. पवारवाडी, अनावळे पाईट, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील विठ्ठल पवार, बबन विठ्ठल पवार, बबन लक्ष्मण पवार, रामदास विठ्ठल पवार, संजना विठ्ठल पवार, वनिता सुभाष पवार (सर्व रा. पवारवाडी, अनावळे पाईट, चाकण), मनीषा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किसन पवार आणि आरोपी यांच्यामध्ये जमिनीच्या कारणावरून पूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी आणि फिर्यादी यांची बुधवारी रात्री पुन्हा भांडणे झाली. एकमेकांना लाठ्या काठ्या व बांबूने मारहाण केली. यामध्ये दोन्हीकडील लोक जखमी झाले.

याच्या परस्पर विरोधी फिर्याद सुनील विठ्ठल पवार (वय 28, रा. पवारवाडी, अनावळे पाईट, चाकण) यांनी दिली. त्यानुसार किसन गणपत पवार, रामदास किसन पवार, दर्शना रामदास पवार, राजू किसन शिंदे, मनीषा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3