Pune – दरोड्याच्या तयारीत असलेल्या तडीपार गुन्हेगारासहित तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सोन्या चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना फरासखाना पोलिसांनी कारवाई करून अटक केली. ही कारवाई काल, बुधवारी (दि.14) रात्री 2 च्या सुमारास मंगळवार पेठेतील मार्केंडेय समाजसेवा मित्र मंडळ जवळ करण्यात आली.

शुभम महेंद्रा सोनवणे (वय 30, रा.शिवाजीनगर), मंगेश ऊर्फ भज्या संजय पवार (वय 22, रा. कोढवाखुर्द), कुमार ऊर्फ कुम्या बाळकृष्ण खुडे (वय 23,रा. वाकडेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गवळी रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना पोलीस नाईक भांदुर्गे आणि शिंदे यांना काही गुन्हेगार मंगळवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणार असून ते सर्वजण मंगळवार पेठेत मार्केंडेय समाजसेवा मित्र मंडळाजवळ उभे असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार फरासखाना पोलिसांनी कारवाई करून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कोयत्यासह इतर घातक धारदार शस्रे जप्त करण्यात आली.

अटक आरोपींपैकी मंगेश ऊर्फ भज्या याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. तपास फरासखाना पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1