Chinchwad : हौशी छायाचित्रकारांसाठी देवदत्त कशाळीकर यांच्याकडून छायाचित्रण प्रशिक्षणाची संधी

20 नोव्हेंबरपासून चिंचवड मध्ये फोटोग्राफी कोर्स प्रवेश प्रक्रिया सुरू

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविलेले पिंपरी-चिंचवड मधील सुप्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांच्याकडून फोटोग्राफी शिकण्याची संधी हौशी आणि नवोदित छायाचित्रकारांना उपलब्ध झालेली आहे. त्यांच्या ‘द फोटोग्राफी स्कूल’च्या माध्यमातून 1 डिसेंबर ते 1 जानेवारी असा एक महिन्याच्या कालावधीचा फोटोग्राफी कोर्स असणार आहे.

‘द फोटोग्राफी स्कूल’ ही पिंपरी-चिंचवडमधील पहिली फोटोग्राफी प्रशिक्षण संस्था असून या संस्थेची ही 23 वी बॅच आहे. यामध्ये नवोदित छायाचित्रकारांना डीएसएलआर सारखे अत्यंत महागडे कॅमेरे, लेन्स हाताळण्याची तसेच या कॅमेऱ्याने फोटोग्राफी शिकण्याची संधी मिळणार आहे. यासाठी निर्धारित शुल्काव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

प्रत्येकाला देवदत्त कशाळीकर हे स्वतः प्रशिक्षण देणार आहेत. कशाळीकर यांना फोटोग्राफीचा मागील 27 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना आजपर्यंय राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावरील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भारत सरकारच्या युवक कल्याण विभागाच्या पुरस्काराचे ते मानकरी आहेत. फोटोग्राफी कोर्स नंतर नवोदित छायाचित्रकारांना व्यावसायिक मार्गदर्शन देखील केले जाणार आहे. नवोदित आणि हौशी छायाचित्रकारांनी या फोटोग्राफी कोर्सचा लाभ घ्यावा से आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी 9822946329 आणि 9850600625 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.