Pune : डॉ. परवेज ग्रांट, डॉ. संजय पाठारे यांना लायन्स इंटरनॅशनल क्लबतर्फे पुरस्कार

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब इंटरनॅशनल, रुबी हॉल क्लिनिक व पतित पावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून मोफत मधुमेह तपासणी व अवयवदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या सोमवारी (दि. 19) कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेज ग्रांट यांना समाजरत्न पुरस्कार, तर वैद्यकीय सेवा संचालक डॉ. संजय पठारे यांना समाज मित्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब्जचे माजी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी श्याम खंडेलवाल, सतीश राजहंस, दिनकर शिलेदार, डॉ. गौरी दामले उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

चंद्रहास शेट्टी म्हणाले, “अवयवदानाचे महत्व पटवून देण्यासाठी व मधुमेहाबाबत जनजागृती करण्यासाठी सकाळी 8 वाजता रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली सिटीप्राईड थिएटर, कोथरुड ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृह अशी निघणार असून, त्याचे उद्घाटन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते होणार आहे. त्यात विद्यार्थी, खेळाडू, मधुमेह रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर्स, नागरिक आणि लायन्स सदस्य सहभागी होणार आहेत. सकाळी 10 ते 12.30 या वेळेत मधुमेह व अवयवदान या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन असणार आहे. त्यामध्ये इन्शुलिन विषयी समज-गैरसमज, मधुमेहा बाबत घ्यायची काळजी, लहान मुलांमधील मधुमेहाची कारणे व दक्षता, मधुमेहींसाठी आहार, अवयवदान जागृती व तणावमुक्त जीवन कसे जगावे या विषयांचा समावेश आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत याच ठिकाणी मधुमेहासंबंधी तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत”

या कार्यक्रमासाठी माजी मंत्री शशिकांत सुतार, प्रांतपाल रमेश शहा, धारिवाल फाउंडेशनच्या शोभा रसिकलाल धारिवाल, उपप्रांतपाल लायन ओमप्रकाश पेठे, लायन अभय शास्त्री, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, मोहन जोशी, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, दिलीप वेडे पाटील, मंजुश्री खर्डेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.