Chinchwad : जळणाऱ्या कचऱ्याच्या धगीने वाचनालय जळून खाक

एमपीसी न्यूज – चिंचवड मोहननगर परिसरातील एक वाचनालय जाळून खाक झाले. ही घटना सोमवारी (दि. 25) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

अग्निशामन दलाचे किरण गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड येथील अनुसया बाबर उद्यानाजवळील एक वाचनालय आहे. या वाचनालयाशेजारी असलेल्या कचऱ्याचा ढिगारा अज्ञात इसमाने पेटवून दिला. त्याची धग लागल्याने वाचनालयाने देखील पेट घेतला. अग्निशामक विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला. मात्र, तोपर्यंत वाचनालय जळून खाक झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.