Talegaon Dabhade : वाढीव कर आकारणीबाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी घेतली मुख्याधिका-यांची भेट

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून आकारण्यात आलेल्या वाढीव कर आकारणी बाबत शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांची भेट घेतली. वाढीव कर आकारणी जनतेच्या हिताची नसून यामुळे सर्वसामान्य जनतेचे नुकसान करणारी असल्याचे यावेळी मुख्याधिका-यांना सांगण्यात आले.

ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे व सुरेशभाऊ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेवकांनी मुख्य अधिकारी वैभव आवारी यांची भेट घेतली. यावेळी नगरसेवक अरूण माने, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, आनंद भेगडे, दिलीप राजगुरव, अशोक काकडे आदी उपस्थित होते.

कर वाढीच्या चुकीच्या मुद्द्यांवर चर्चा करून मुख्याधिकारी यांच्याकडे याबाबत विशेष सभा बोलावून सुधारित कर प्रणाली लागू करण्याची मागणी केली. यामुळे सर्वसामान्य जनता अडचणीत आली आहे. त्यांच्यावर चुकीची करवाढ लादण्यात येत आहे. ही करवाढ कमी झाली नाही तर सर्वसामान्य जनतेसोबत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.