Pune : शिवाजीनगर पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये आग ; जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज- शिवाजीनगर भागातील पाटील इस्टेट मधील गल्ली नंबर 5 मध्ये एका घराला आग लागली. ही घटना आज, मंगळवारी पहाटे 3 वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र घटनास्थळापर्यंत अग्निशामक दलाची गाडी पोहोचू शकत नसल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागली.

_MPC_DIR_MPU_II

पुणे अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. झोपडपट्टी भाग असल्यामुळे तिथे सर्वच घरे अगदी जवळ जवळ चिटकून अशी आहेत. आग लागलेल्या घरात लोक खालच्या मजल्यावर झोपले होते. सुरवातीला वरच्या मजल्यावर आग लागली. आग लागल्याचे लक्षात येताच सर्वजण बाहेर पडले.

अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी जाऊ शकत नसल्यामुळे 17 पाईप वापरून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या घटनेत एक घर पूर्णपणे जळून खाक झाले असून आसपासच्या 1-2 घराचे थोडेफार नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.