Hinjawadi : हिंजवडी पोलिसांकडून बारा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज – हिंजवडी पोलिसांनी तब्बल 11 लाख 75 हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. 26) हिंजवडी मधील पुणे-मुंबई महामार्गावर वाकड पुलाखाली केली.

दर्शन दत्तात्रय तुरेकर (वय 30), पंकज दत्तात्रय तुरेकर (वय 27, दोघे रा. मगरआळी, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी हिंजवडी येथे गस्त घालत असताना पोलीस नाईक कुणाल शिंदे यांना माहिती मिळाली की, मुंबई येथून एक 407 टेम्पो गुटखा घेऊन देहूरोड कात्रज बायपासने जाणार आहे. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी वाकड पुलाखाली सापळा रचून एक टेम्पो (एम एच 12 / जे एफ 2829) आणि एक पीक अप (एम एच 12 / एन एक्स 7895) या दोन वाहनांना थांबवून त्यांची झडती घेण्यात आली. टेम्पोमध्ये 11 लाख 75 हजार रुपये किमतीचा विमल मसाला गुटखा आढळून आला. पोलिसांनी एक टेम्पो एक पीक अप आणि गुटखा असा एकूण 24 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, पोलीस कर्मचारी किरण पवार, अतिक शेख, कुणाल शिंदे, विकी कदम, श्रीकांत कदम यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.