Pimpri : प्रभाग क्रमांक 11 मधील पथदिवे,सीसीटीव्ही या बाबींचा मूळ अंदाजपत्रकात समावेश करा

एमपीसी  न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ क्षेत्रीय’ कार्यालयाचे सन 2018-19 चे सुधारित व सन 2019-20 चे मुळ अंदाजपत्रक तयार करण्याचे काम चालू आहे. या अंदाजपत्रकात स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी काही कामांचा अंतर्भाव करण्याच्या सूचना, फ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्युत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

यात कुदळवाडी प्रभाग क्रमांक 11 मध्ये नव्याने विकसित केलेले रस्ते तसेच अंतर्गत रस्ते,  या ठिकाणी पथदिव्यांचे खांब उभारणी, काही ठिकाणचे जुने विद्युत दिवे बदलून एलईडी दिवे बसविणे, मुख्य चौकात हायमस्ट दिवे बसविणे, बीआरटी रस्त्यावरील मध्यभागी असलेले खांब बदलून, नवीन खांब बसविण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

कुद्ळवाडीतील वाढत्या उद्योग, व्यवसायामुळे रोजगार वाढला आहे. लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोरी तसेच इतर अन्य अनैतिक बाबीही प्रभागात वाढल्या आहेत. सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस उपस्थित होत आहे. याकरीता महापालिकेने प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात यावा, जेणेकरून चोरींच्या घटनांना आळा बसेल. महापालिकेने मूळ अंदाजपत्रक तयार करताना या बाबींकडे लक्ष देवून या बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करण्याची मागणी,  स्विकृत नगरसेवक दिनेश यादव यांनी ‘फ क्षेत्रीय’ कार्यालयाच्या विद्युत विभागास केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.