Pune – स्पा मसाज सेंटरवर छापा;3 परदेशी मुलींची वेश्या व्यवसायाततून सुटका

एमपीसी न्यूज- स्पा मसाज सेंटरवर छापा घालून 3 परदेशी मुलींची वेश्या व्यवसायाततून सुटका करून दोन मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. हा छापा  विमाननगर येथील आमंत्रा स्पा सेंटर 22 नोव्हेंबरला संध्याकाळी 7 च्या दरम्यान टाकण्यात आला.

अमर रामराव धुमाळ(वय 27, केशवनगर मुंढवा), तुषार अशोक बनसोडे (वय 28,वडगांव शेरी) अशी अटक करण्यात आलेल्या स्पाच्या मॅनेजरची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील अटक केलेल्या दोघा मॅनेजरनी मिळून विमाननगर येथील आमंत्रा स्पा सेंटर येथे थायलंड येथील तीन तरूणींना थेरपीस्ट म्हणून नोकरीस ठेवले होते. आणि त्यानंतर तरूणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते.

पोलीसांना ही सर्व हकीकत बातमीदारकडून माहित होताच त्यांनी तेथे छापा घालून 3 परदेशी मुलींची सुटका केली.व कारवाई दरम्यान 4 हजार 500 रूपयांची रोकड, 1 मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. तसेच पिडीत तरूणींना हडपसर येथील रेस्क्यु होम येथे संरक्षणकामी ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.