Pimpri: बड्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करावा;अन्यथा कारवाई-आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या उत्पन्नाचे मालमत्ता कर हे प्रमुख स्त्रोत आहे. भविष्यात मालमत्ता करावरच अंवलबून रहावे लागणार आहे. नागरिकांनी शास्तीकराची वाट न बघता मालमत्ता कराचा भरणा करावा. त्यामुळे कारवाईची टांगती तलवार राहणार नाही. जेवढे उत्पन्न वाढेल, तेवढी अधिक सुधारणा होईल. शहराचे मानांकन वाढेल. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करावा. मोठ्या मालमत्ता धारकांनी भरणा न केल्यास त्यांच्यावर सर्वांत अगोदर कारवाई केली जाईल असा इशारा, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्यातील इतर महापालिकांपेक्षा पिंपरी महापालिकेची कराची वसुली कमी आहे. सध्या एलबीटी मिळतो. त्यामुळे त्यावर अवलंबून राहणे चुकीचे आहे. कर वसुली करण्यावर भर देणे आवश्यक आहे. जेवढे उत्पन्न वाढेल, तेवढ्या सुधारणा होतील. शहराचे मानांकन सुधारेल. नागरिकांनी मानसिक त्रास देण्याची प्रशासनाची भुमिका नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी स्वत:हून कराचा भरणा करावा.

अधिका-यांना मिळकत कर महत्वाचा वाटत नाही. परंतु, महापालिकेच्या उत्पन्नाचे मालमत्ता कर हे प्रमुख स्त्रोत आहे. भविष्यात मिळकत करावरच अंवलबून रहावे लागणार आहे. बांधकाम अन्‌ भांडार विभागाच्याच अधिक फाईल आपल्या टेबलवर येत आहेत. मिळकरासंदर्भातील फाईल येत नाहीत. यापुढे कर आकारणी विभागातील निर्णय प्रलंबित राहिल्यास वरिष्ठांना देखील जबाबदार धरण्यात येईल. फाईल प्रलंबित राहिल्यास त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.