_MPC_DIR_MPU_III

Pimpri: ‘पीएमआरडी’चा पुढील 20 वर्षांचा वाहतूक आराखडा तयार 

एमपीसी न्यूज – पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) तर्फे पुणे व पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील वेगाने वाढणा-या लोकसंख्येचा विचार करता उपनगरांचा पुढील 20 वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार केला आहे. जिल्ह्यातील 10 तालुक्यांचा यामध्ये समावेश केला असून मेट्रो, वर्तुळाकार रेल्वे, रिंगरोड, बीआरटी मार्ग, बस टर्मिनल आदींचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती, पीएमआरडीएचे नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी आज (बुधवारी) दिली.

_MPC_DIR_MPU_IV

आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात पत्रकारांना पुणे महानगर प्रदेशासाठीच्या वाहतूक आराखड्याचे खरवडकर यांनी सादरीकरण केले. यावेळी अधिक्षक अभियंता रिनाज पठाण उपस्थित होत्या.

नगर नियोजनकार विवेक खरवडकर म्हणाले, पुढील 20 वर्षांचा म्हणजे 2038 पर्यंतचा विचार करून चार टप्प्यांत कामाचे नियोजन करण्यात येत आहे. एल ऍण्ड टी कंपनीने प्रत्यक्ष पाहणी करून हा सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे.   पुणे महानगरपालिका हद्द (332 चौरस कि.मी. क्षेत्रफळ), पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्द (210 चौरस कि. मी. क्षेत्रफळ) असे एकूण 542 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा यामध्ये समावेश केला आहे. तर, उर्वरित पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील मुळशी, मावळ, पुणे शहर, हवेली, खेड, शिरूर, दौंड, पुरंदर, भोर व वेल्हा या दहा तालुक्यांचा समावेश आहे. एकूण 2 हजार 172 चौरस किलोमीटर क्षेत्रफळासाठी सर्वकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. तसेच दर पाच वर्षांनंतर हा आराखडा सुधारित करण्याची तरतुद करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, रेल्वे विभाग, पुणे आणि ग्रामीण पोलीस, वाहतूक विभाग, तीन कॅन्टोमेंन्ट विभागाचे आधिकारी तसेच नगरपालिकांच्या सहाय्याने  पीएमआरडीएच्या सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अंमलबजावणीनंतर वाहतूक कोंडी  आणि उपनगरांमध्ये पायाभूत सुविधा  निर्माण होणार आहेत. सर्वंकष वाहतूक आराखड्‌यामध्ये रेल्वे वाहतूक व बस वाहतूक या सार्वजनिक वाहतूक योजनावर भर देण्यात आला आहे. सध्यस्थितीत एकूण वाहतूक वर्दळीच्या 71 टक्के वाटा हा खासगी मोटार  व दुचाकी वाहनांचा असून फक्त 29 टक्के वाटा हा बस व रिक्षा या सार्वजनिक वाहनाचा आहे.

सीएमपीमध्ये  अंदाजित वाहतुकीची वाढ ही व्यापारी वाहतूकीत होणारी वाढ आणि कालानुरूप होणारी वाढ या दोन तत्वांवर आधारित आहे. यानुसार, शाश्र्वत वाहतूक सेवा देण्याच्या दिशेने  पावले उचलण्यात आली नाहीत तर खाजगी वाहनाच्या संख्येत बेसुमार वाढ होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडेल. यामुळे होणारी वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि  पर्यावरण, आर्थिक नुकसान नागरिकांना याचा त्रास होणार आहे.
सार्वजनिक वाहतूक वर्दळीचा सहभाग 50 टक्यापर्यंत वाढविण्यासाठी आणि खाजगी वाहतूक 50 टक्यांपर्यंत कमी करणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वाहनांचा वापर न करता पायी तसेच सायकलने  प्रवास करणे यात वाढ करण्यावर भर देण्यात आला आल्याचे पीएमआरडीएचे नगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी सांगितले.

सर्वंकष वाहतूक आराखड्यातील प्रस्तावित प्रकल्प!

 • 210  किमीसाठी BRT जाळे
 • 125  कि.मी.ची मेट्रोलाईन तसेच 70 कि.मी. साठी लाईट मेट्रो
 • 18 ठिकाणी दळणवळणाची बहुउद्देशीय स्थानके
 • विद्यमान उपनगरीय रेल्वे सेवेची क्षमता वाढवणे, नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करणे
 • प्राधिकरण क्षेत्रातील 128 किमीचा रिंगरोड, पुणे महापालिका हद्दीतील 39 किमी रिंग रोड आणि पिंपरी पालिका हद्दीतील 80 किमी लांबीचा प्रस्तावित मध्यवर्ती रिंगरोड
 • पीएमआरडीए क्षेत्रातील पुणे सातारा, पुणे नगर, पुणे सोलापूर, पुणे नाशिक राज्यमार्गांचे रुंदीकरण करणे
  प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी पोहोच रस्ते विकसित करणे.
 • PMC व PCMC हद्दीबाहेर 5  Inter State Bus Terminals (ISBT) उभारणे
 • PMC व PCMC हद्दीबाहेर 6 अवजड वाहतुकीसाठी ट्रक टर्मिनस उभारणे
 • वाहन मुक्त रस्ते, USDG प्रमाणे रुंद पदपथ, सायकल ट्रॅक, सुरक्षित पादचारी क्रोसिंग,व सक्षम सिग्नल यंत्रणा उभी करणे, वाहनतळाचे नियोजन करणे.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.