Pimple Saudagar : सबवेच्या कामाची नगरसेवक आणि अधिका-यांकडून पाहणी

एमपीसी  न्यूज –  वाकड ते नाशिक फाटा बीआरटी मार्गावरील गोविंद यशदा चौक बांधण्यात येणा-या सब-वेचे एप्रिल महिन्यात भूमिपूजन करण्यात आले होते. हे काम प्रगती पथावर आहे. नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी संबधित अधिका-यासमवेत या कामाची पाहणी केली.

एप्रिल पासून आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेवून अधिका-यांना या सब-वे चे काम लवकर पूर्ण करून नागरिकांना हा रस्ता वाहतुकीस खुला करून देण्यात यावा अशा सुचना नगरसेवक नाना काटे यांनी अधिका-यांना दिल्या.

या वेळी कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे,उपभियंता संजय काशीद,उपभियंता साळी साहेब,कनिष्ठ अभियंता धाडे, ठेकेदार खोसे,ठेकेदार एस.एस.साठे, लिनियर गार्डनचे प्रकल्प सल्लागार धीरज पाटील आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.