Chinchwad : प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत यश

एमपीसी  न्यूज – चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात इ. 11 वी विज्ञान शाखेत शिकत असेलेली कु. अंजली रानवडे (वय 16 वर्षे) या विद्यार्थीनीने हरियाना कुरुक्षेत्र येथे दि.21 ते 24 नोव्हेंबर, 2018 दरम्याने झालेल्या 23 व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करीत सब ज्यूनिअर गटात सुवर्ण आणि ब्रांझ पदक पटकाविले.

तिच्या दैदित्यमान यशाबद्दल कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.दीपक शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, उपप्राचार्य डॉ.जयश्री मुळे, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरीया, प्रतिभा शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. प्रोर्णिमा कदम, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यायलयाच्या उपप्राचार्या डॉ.वनिता कुर्‍हाडे, क्रिडा विभाग प्रमुख शबाना शेख, क्रिडा शिक्षक दर्शन गंधे समवेत शिक्षक आणि कर्मचारी वृंदानी कौंतुक करुन शुभेच्छा दिल्या.

कु.अंजली रानवडे, चिंचवडगाव परिसरात रस्टन कॉलनीत रहात असून, लहान पणापासून सायकलिंग मध्ये विशेष आवड होती. राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड समितीने निवडलेला महाराष्ट्राचा संघ प्रा.संजय साठे यांनी जाहीर केला होता. त्यात सब ज्युनिअर गटातील स्पर्धेसाठी अंजली रानवडे हिची निवड केली होती. निवड समितीने दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवित तिने असामान्य कामिगरी केली आहे. महाराष्ट्रातुन सब ज्युनिअर गटात पुणे, क्रिडा प्रबोधिनी, कोल्हापूर येथील स्पर्धक सहभाग झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.