Bhosari : दुचाकी चोरणा-या उच्च शिक्षित तरुणाकडून 33 मोपेड दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – शाळा महाविद्यालयांच्या पार्किंग परिसरातून दुचाकी चोरणा-या एका अट्टल दुचाकी चोराला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 33 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील 13 पोलीस ठाण्यातील 33 गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून 16 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, गो शाळेच्या मागे, वडगाव रोड, आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार ,  अटक केलेल्या चोराचे बी.कॉमचे शिक्षण घेतले आहे. हा चोर महाविद्यालयाच्या पार्किंग मधून चोरी करीत होता. चोरी केलेल्या दुचाकी मित्रांच्या मदतीने किरकोळ किमतीला विकत असे. भोसरी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार भोसरी परिसरात सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. त्याने विकलेल्या दुचाकी घेतलेल्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.