Pune : समन्वयाच्या आभावाचा बाधितांना फटका !

कालवा फुटी-आधी म्हणाले साहित्य देऊ आणि आता अनुदान बॅंकेत देण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – मुठा उजवा कालवा फुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्यासाठी महापालिकेस तब्बल दोन महिन्यांनंतर वेळ मिळाला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा प्रकारे मदत देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच साहित्य देऊ असा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता अचानक प्रशासनाने अनुदान बॅंकेत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालिकेच्या इच्छाशक्तीवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.

दरम्यान, कालवा फुटून कासम प्लॉट येथील झोपडपट्टी वस्तीमध्ये पाणी वाहात होते. सिंहगड रस्त्यावरील केदार सहकारी गृहरचना संस्था व स्टेट बॅंक कॉलनीमधून रस्त्यावर आलेले पाणी दांडेकर पूल परिसरात पसरल्याने या झोपडपट्टीतील कुटुंबे बाधित झाली होती. पाण्याच्या प्रवाहाने काही झोपड्या पडल्या होत्या. अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू, भांडी, टीव्ही, फ्रीज, गॅस सिलिंडर, कपडे, शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, महत्त्वाची कागदपत्रे आदी सामान वाहून गेले होते. ही बाब लक्षात घेऊन महापौर मुक्ता टिळक यांनी तातडीने 11 हजार रुपयांची मदत जाहीर केली. मात्र, आयुक्तांसह, प्रशासनाने अशा प्रकारे मदत देण्याचा अधिकार नसल्याचे सांगितले. तसेच साहित्य देऊ असा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता अचानक प्रशासनाने अनुदान बॅंकेत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, अनुदानाच द्यायचे होते, तर दोन महिने कशासाठी लावले असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.

आता पूर्णतः बाधित 90 कुटुंबांसाठी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि अंशतः बाधित 669 कुटुंबांसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये मदत करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मग त्यावेळेस पालिका प्रशासन आणि अधिकारी यांच्यात समन्वय नसल्याचा फटका आता बाधितांना बसत असल्याचे चित्र आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.