Talegaon : सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – सरसेनापती दाभाडे राजघराण्यातील लढवय्यांनी शौर्य आणि कार्यकर्तृत्वाने व दिलेल्या योगदानामुळे तळेगाव दाभाडेची ओळख ऐतिहासिक शहर अशी आहे. ती जपण्यासाठी प्रत्येकाने एकदिलाने प्रयत्न केले पाहिजेत. असे मत सरसेनापती उमाबाईसाहेब दाभाडे यांच्या 265व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधीस्थळावर अभिवादन सभेत मान्यवरांनी व्यक्त केले.

येथील बनेश्वर येथील समाधीस्थळावर सरसेनापती दाभाडे कुटुंबियांनी प्रथम सरसेनापती उमाबाईसाहेब समाधीचे पूजन केले. यामध्ये  माजी नगराध्यक्षा अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे महिला व बालकल्याण संस्थेच्या अध्यक्षा याज्ञसेनीराजे दाभाडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नूमवि प्रसारक मंडळाचे सदस्य मुकुंदराव खळदे, संतोष दाभाडे पाटील, नगरसेविका शोभा भेगडे, वैशाली दाभाडे, चंद्रकला दाभाडे, सविता दाभाडे, रूपाली दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष गिरिष खेर, श्यामराव दाभाडे, निलिमा दाभाडे, राजेश सरोदे, साहेबराव दाभाडे,बजरंग जाधव,अँड विनय दाभाडे,बाळासाहेब गायकवाड, दिनेश कोतूळकर आदींनी पुष्पांजली वाहिली.

यावेळी मराठा साम्राज्याच्या इतिहासाचे काही नवे पैलू संशोधनांती हाती आले असून ते लवकरच लोकांसमोर सादर करणार असल्याचा संकल्प मराठा इतिहासाचे अभ्यासक अॅड.विनय दाभाडे यांनी जाहिर केला. महिला लोकप्रतिनिधींसाठी सरसेनापतीं उमाबाईसाहेब या प्रेरणा व शक्तीपीठ असल्याचे नगराध्यक्षा चित्रा जगनाडे म्हणाल्या. ऐतिहासिक कर्तृत्वाचा वारसा जपण्यासाठी सर्वांनी दाभाडे घराण्यासमवेत काम करण्याची गरज असल्याचे मत सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेडचे संस्थापक अमीन खान यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन मनोहर दाभाडे यांनी केले. समाधीस्थळासमोर दोन मिनिटे उभे राहून सार्वजनिक आदरांजली वाहण्यात आली.

त्याच बरोबर तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्षा चित्रा जगनाडे व सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेच्या कार्यालयात अध्यक्ष बजरंग जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.