Pune : मराठा आरक्षण : जागरण गोंधळ घालत भाजपचा पुण्यात जल्लोष

मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून गुरुवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर झाले आहे. मराठा समाजासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला असून हे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत कोणत्याही चर्चेविना मंजूर करण्यात आले आहे. मराठा समाजाला 26 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचा जल्लोष संपूर्ण राज्यभर केला जात आहे. पुण्यात देखील भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात जल्लोश करण्यात आला. पुण्यातील अलका चौकात भाजप तर्फे जागरण – गोंधळ घालत राज्यसरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष करण्यात आला.’जे सत्तर वर्षात जमल नाही ते चार वर्षात करून दाखवल’ अशा आशयाची पोस्टरबाजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केली. पारंपारिक वेशभूषेत भाजप कार्यकर्त्यांनी या जल्लोषाला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

दरम्यान, मराठा समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करून 16 टक्के आरक्षणाची तरतूद करणारे विधेयक राज्य विधिमंडळात गुरुवारी सादर करण्यात आले. त्यापूर्वी राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावरील कृती अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. कृती अहवाल सादर केल्यानंतर विधानसभेतील सदस्यांनी अहवाल वाचनासाठी काही वेळ द्या, अशी विनंती केली. दुपारी यासंदर्भात कामकाजाला सुरुवात होताच कोणत्याही चर्चेविना विधेयक मंजूर झाले आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.